Join us  

मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ; १२ परिमंडळात विशेष पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:21 PM

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटोक्यात आणन्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न सुरु असताना नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी होत नसल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटोक्यात आणन्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न सुरु असताना नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी होत नसल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आयुक्तालयातील सर्व १२ परिमंडळामध्ये स्वतंत्र १२ पथके नेमण्यात आली आहे.

प्रत्येक पथकात अधिकार्यासह१४  अंमलदाराचा  समावेश आहे. या 'लिमा' पथकाकडून नियमाचे पालन न करणार्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी घरात बसणे, हा सर्वात बचावात्मक उपाय आहे. मात्र त्यांच्याकडून त्याचे उल्लंघन केले  जात आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे. जमाव बंदीचा कायदा मोडणार्या त्याचप्रमाणे विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर फिरणार्सांयावर गुन्हे दाखल करण्यात  येत आहेत, मात्र त्याचे प्नमाण वाढत राहिल्याने अतिरिक्त  मनुष्य बळ वापरला जात आहे .पोलीस आयुक्त परमबीर सिंग यानी दिले आहेत.त्यानसार १२ लिमा पथके प्रत्येक परिमंडळामध्ये कार्यरत करण्यात येत आहे. प्रत्येक पथक १५ जणांचे आहे.त्यामध्ये  १ अधिकारी व १४ पोलिसांचा समावेश आहे. त्यांना मास्क,सानटायझर आणि अन्य आवश्यक साघने पुरविण्यात आली आहे. त्यांना परिमंडळात गस्त घालण्याची ड्युटी देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाकडून आलेल्या सूचनेनुसार त्यांना आवश्यकतेनुसार  बंदोबस्ताच्या ठिकाणी जावून कायदा व सुव्यवस्था नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलिसांना मदत करावयाची आहे.

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या