मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांत वाढ
By Admin | Updated: January 10, 2017 04:26 IST2017-01-10T04:26:11+5:302017-01-10T04:26:11+5:30
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने अधिनियमात सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश

मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांत वाढ
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने अधिनियमात सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश काढण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्य मागासवर्ग आयोगाची रचना आता अध्यक्ष, तज्ज्ञ सदस्य आणि सहा महसूल विभागातील आठ सदस्य अशी राहणार आहे. त्यामुळे आता आयोगावर एकूण १० पदाधिकारी असतील.
आयुष संचालनालयाअंतर्गत विविध संवर्गातील वैद्यकीय अर्हताधारक ५६ पदांना सहाव्या वेतन आयोगानुसार ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आतापर्यंत २५ टक्क्यांप्रमाणे हा भत्ता लागू होता. (विशेष प्रतिनिधी)