Join us  

लोकलच्या फेऱ्या वाढवा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 3:47 AM

राज्य सरकारने अनेक सेक्टर खुली केली. त्यामुळे आता लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची वेळ आली आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.

मुंबई : राज्य सरकार हळूहळू लॉकडाऊन शिथिल करीत असल्याने सरकारने लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली.राज्य सरकारने अनेक सेक्टर खुली केली. त्यामुळे आता लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची वेळ आली आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. लॉकडाऊन बऱ्यापैकी उठविण्यात आला आहे. मॉल्स सुरू झाले आहेत. हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कार्यालयेही १०० टक्के कार्यक्षमतेने सुरू असून खासगी कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे लोकलच्या फेºया वाढवा, असे न्यायालयाने म्हटले. गर्दी टाळण्यासाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरच्या लोकलची सेवा वाढविणे गरजेचे आहे. या सूचनेवर विचार करा आणि रेल्वे प्रशासनाला तसा प्रस्ताव पाठवा, असे न्यायालयाने म्हटले.वकील व त्यांच्या लिपिकांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत लोकलमधून प्रवासास मुभा द्यावी, अशी मागणी करणाºया अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. मध्य रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या ६०० तर पश्चिम रेल्वेवर ही संख्या ७०० करावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली. सध्या दिवसभरात मध्य रेल्वे मार्गावर ४३१ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ५१२ फेऱ्या होतात.आम्ही राज्य सरकार किंवा रेल्वेला लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचे निर्देश देऊ शकत नाही. मात्र, राज्य सरकार आमच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देईल, असा विश्वास आणि आशा आहे. ही सूचना केवळ वकील किंवा त्यांच्या कर्मचाºयांसाठी केलेली नाही. सामान्यांचाही विचार केला आहे, असे न्यायालयाने म्हटले.‘माहिती शुक्रवारपर्यंत सादर करा’मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथील प्रत्येक बार असोसिएशनला त्यांचे किती वकील प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्यास इच्छुक आहेत आणि त्यासाठी ते लोकलने प्रवास करण्यास तयार आहेत, याची माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

टॅग्स :मुंबई हायकोर्टमुंबई लोकलपश्चिम रेल्वेमध्य रेल्वे