धरणांची पातळी वाढेना!
By Admin | Updated: July 6, 2014 01:35 IST2014-07-06T01:35:53+5:302014-07-06T01:35:53+5:30
मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत अद्यापही समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे.

धरणांची पातळी वाढेना!
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत अद्यापही समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईकर चिंताग्रस्त झाले आहेत.
मान्सूनच्या आगमनानंतरही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पूर्वार्धात मान्सून मुंबईत पुन्हा सक्रिय झाला. मात्र पहिला दिवस वगळता नंतर त्याने फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रतही पाऊस समाधानकारक बरसलेला नाही. विहार आणि तुळशी तलावांच्या पाणलोट क्षेत्रतही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
परिणामी, तलावक्षेत्रंची पातळी अद्याप वाढलेली नाही. त्यातच भविष्यात पाण्याचा साठा सुरक्षित राहावा म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने 15 टक्के पाणीकपात सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईला सध्या 3,187 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो आहे.
महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या सरासरीच्या अवघे 21 टक्के पावसाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे जलाशयांत मागील 1क् वर्षातील सरासरीच्या निम्माच पाणीसाठा शिल्लक आहे. शिवाय वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी तीन महिन्यांत किमान 27क्क् मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे. अपर वैतरणातील राखीव साठय़ातून 5क् हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्याची विनंती महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला केली होती. दररोज किमान 8क्क् क्युसेक्स पाणी सोडण्यात यावे, असे महापालिकेचे म्हणणो होते. मात्र 16 जूनपासून 3क्क् क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. (प्रतिनिधी)
च्पाऊस लांबल्याने महापालिका प्रशासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा मागविल्या होत्या; आणि त्या भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. मात्र प्रशासनाने त्याला 15 जुलैर्पयत मुदतवाढ दिली असून, हा पाऊस पाडण्यासाठी 15 कोटी खर्च अपेक्षित आहे. या कृत्रिम पावसाकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत.