Income tax department raids at nine places in Mumbai; Bank transactions, computer data confiscated | प्राप्तिकर विभागाचे मुंबईत नऊ ठिकाणी छापे; बँक व्यवहार, संगणकीय डाटा जप्त

प्राप्तिकर विभागाचे मुंबईत नऊ ठिकाणी छापे; बँक व्यवहार, संगणकीय डाटा जप्त

मुंबई : प्राप्तिकर विभागाने मुंबईत तीन कंपन्यांच्या विविध ठिकाणच्या नऊ कार्यालयांवर छापे टाकले.
त्यापैकी एक कंपनी हॉटेल, जलविद्युत, धातू आणि वाहन उद्योग अशा विविध उद्योगांमध्ये आहे. या सर्व उद्योगांमधून मिळालेली बेहिशेबी मालमत्ता या कंपनीने बांधकाम उद्योग क्षेत्रात गुंतवल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे.
दुसरी कंपनी चांदी-सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्राचीन वस्तूंच्या व्यवसायात असून त्यांच्या इंग्लंड, अमेरिका अशा विविध देशांमध्ये सहकारी कंपन्या आहेत. या देशांमध्ये त्यांची बँक खातीही आहेत. चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून बेनामी व्यवसायही सुरू असल्याचा या कंपनीवर आरोप आहे. तर तिसरी कंपनी हॉटेल व्यवसायात आहे. तिच्या उत्पन्नाचे स्रोत तपासण्यासाठी ही मोहीम राबवली गेली. या कंपन्या सोन्या-चांदीच्या बाजारात रोखीने व्यवहार करत असल्याचे आणि त्यांनी अनेक मालमत्ता रोखीने विकत घेतल्याचे ठोस पुरावे जसे की, काही कागदपत्रे, नोंदवह्या, डिजिटल डेटा या तपासणीतून ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Income tax department raids at nine places in Mumbai; Bank transactions, computer data confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.