Join us

कल्पतरू बिल्डर्सवर आयकर विभागाचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2023 14:02 IST

या छापेमारीदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीचे संस्थापक मोफतराज मुनोत आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पराग मुनोत यांच्या निवासस्थानीदेखील छापेमारी केल्याची माहिती आहे. 

मुंबई : बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कल्पतरू बिल्डर्सवर शुक्रवारी आयकर विभागाने छापेमारी केली. मुंबई, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा चार ठिकाणी कंपनीशी संबंधित एकूण ३० ठिकाणी आयकर अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीचे संस्थापक मोफतराज मुनोत आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पराग मुनोत यांच्या निवासस्थानीदेखील छापेमारी केल्याची माहिती आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने शेकडो कोटी रुपयांची करचोरी केल्याचा संशय असून, त्या अनुषंगानेच ही छापेमारीची कारवाई झाली. कल्पतरू समूहाच्या कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लि., प्रॉपर्टी सोल्यूशन्स इंडिया, श्री शुभम लॉजिस्टिक आणि कल्पतरू लि. या ४ कंपन्या प्रामुख्याने आयकरच्या रडारवर असल्याचे समजते. 

टॅग्स :मुख्य आयकर आयुक्त कार्यालयमुंबई