प्रवाशास लुबाडणारे दोघे जेरबंद, आरोपींमध्ये रेल्वे पोलिसांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 03:05 IST2018-10-06T03:02:43+5:302018-10-06T03:05:03+5:30

गुन्हा दाखल : आरोपींमध्ये रेल्वे पोलिसांचाही समावेश

Including railway police in both the robbers, robbers and the accused | प्रवाशास लुबाडणारे दोघे जेरबंद, आरोपींमध्ये रेल्वे पोलिसांचाही समावेश

प्रवाशास लुबाडणारे दोघे जेरबंद, आरोपींमध्ये रेल्वे पोलिसांचाही समावेश

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकासमोरील एसटी स्थानकातील शौचालयातून एका प्रवाशाचे गुरुवारी दुपारी अपहरण करून त्याच्याकडून १० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा ३५ हजारांचा ऐवज लुबाडणाऱ्या रेल्वे पोलीस दलातील हवालदार सुभाष नागरे आणि होमगार्ड भूषण मोरे या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

हा प्रवासी ठाणे एसटी स्थानकातील सार्वजनिक शौचालयामध्ये ४ आॅक्टोबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास लघुशंकेसाठी आला. त्या वेळी भूषण मोरे या गृहरक्षक दलाच्या जवानाने तू माझ्या गुप्तांगाला हात लावला, असा आरोप त्याच्यावर केला. त्यानंतर, हा प्रकार बाहेर सांगण्याची धमकीही त्याला दिली. त्यानंतर, नागरे या हवालदारासह दोघांनीही त्याला कळवा रेल्वे स्थानकाबाहेरील चौकीत नेले. तिथे त्याला शिवीगाळी, मारहाण करून त्याच्याकडून १५ हजारांची एक आणि १० हजारांची दुसरी अशा दोन सोनसाखळ्या तसेच १० हजारांची रोकड असा ऐवज हिसकावला. दुपारी २ ते ४ असा दोन तास हा प्रकार सुरू होता. आपला कोणताही दोष नसताना नाहक पोलिसांनीच लूटमार केल्याचे या प्रवाशाने नातेवाइकांना सांगितले. हा प्रकार समजताच त्यांनी पुन्हा कळवा स्थानकातील चौकी गाठून तिथे ही तक्रार दिली. सोनाराने दागिने घेतलेच नाहीत. या प्रवाशाकडील दागिन्यांची लूटमार केल्यानंतर नागरे आणि मोरे या दोघांनीही बाजारपेठेतील एका सराफाकडे हे दागिने विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काहीतरी शंका आल्यामुळे त्याने ते घेतले नाहीत. त्यातील एक सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली असून दुसºया सोनसाखळीचाही शोध घेण्यात येत आहे.
 

Web Title: Including railway police in both the robbers, robbers and the accused

टॅग्स :thaneठाणे