माहिती तंत्रज्ञान सुविधा तपासणी समितीच्या अकस्मात भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:21 IST2017-11-25T00:21:48+5:302017-11-25T00:21:59+5:30
मुंबई विद्यापीठाने पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर एक सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. या समितीने आपला अहवाल विद्यापीठास सादर केला.

माहिती तंत्रज्ञान सुविधा तपासणी समितीच्या अकस्मात भेटी
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर एक सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. या समितीने आपला अहवाल विद्यापीठास सादर केला. या अहवालात DEPDSच्या संदर्भात गैरमार्गाला प्रतिबंध करण्यासंबंधीची महत्वाची शिफारस केली होती. यानुसार विद्यापीठाने माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा तपास करण्यासाठी "माहिती तंत्रज्ञान सुविधा तपासणी समितीच्या" (IT Infrastructure Inspection Committee) या स्वरूपाची दोन भरारी पथके स्थापन नेमण्यात आलेली असून ते परीक्षा केंद्रांना अकस्मात भेटी देऊन तेथील माहिती तंत्रज्ञान सुविधांची तपासणी करणार आहेत. "या एक सदस्यीय समितीच्या अहवालानंतर विद्यापीठाने केलेली ही तातडीने कारवाई होय. या भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना अकस्मात भेटी देऊन तपासाचे काम सुरू केले आहे", अशी माहिती विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांनी दिली आहे.