नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी - गृहमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:07 IST2021-04-22T04:07:03+5:302021-04-22T04:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला ...

Incident at Nashik Municipal Hospital is very unfortunate - Home Minister | नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी - गृहमंत्री

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी - गृहमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या नातेवाइकांप्रती सांत्वना व्यक्त केली आहे.

या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच राज्य शासनामार्फत मृताच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. यापुढे राज्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यावी. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरू राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

......................................

Web Title: Incident at Nashik Municipal Hospital is very unfortunate - Home Minister