कांदिवलीत अण्णाभाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन उत्साहात
By मनोहर कुंभेजकर | Updated: August 1, 2023 16:55 IST2023-08-01T16:55:20+5:302023-08-01T16:55:34+5:30
लोखंडवाला येथील अण्णाभाऊ साठे उद्यानात हे भित्ती शिल्प उभारण्यात आले आहे.

कांदिवलीत अण्णाभाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन उत्साहात
मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला येथे भाजप नेते व स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लोखंडवाला येथील अण्णाभाऊ साठे उद्यानात हे भित्ती शिल्प उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजातील कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकसांसाठी झगडण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हि व्यक्तिमत्वे आमच्यासाठी राजकारणाचे विषय नाहीत. ही व्यक्तिमत्वेच इतकी मोठी आहेत की त्यांनी समाजाला, देशाला नाही तर उभ्या जगाला मार्गदर्शन करण्याचे काम केले.यावेळी त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.