दहिसरच्या श्री गांवदेवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 15, 2023 17:38 IST2023-06-15T17:38:23+5:302023-06-15T17:38:42+5:30
मुंबई -दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने निर्माण करण्यात आलेल्या मुंबई महानगर ...

दहिसरच्या श्री गांवदेवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा
मुंबई-दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने निर्माण करण्यात आलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या श्री गांवदेवी मनोरंजन उद्यानाचा लोकार्पण आज मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
३५६८ चौ.मी क्षेत्रफळाचं हे उद्यान असून कम्युनिटी पार्क अशी याची थीम आहे. छतासह बसण्याची सुविधा, मुलांना खेळण्याचे क्षेत्र, खुले व्यायाम क्षेत्र, लॉन क्षेत्र तसच स्थानिक गावकऱ्यांच्या मागणीनुसार होलिका दहन करण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र ही या उद्यानात ठेवण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून या उद्यानाचं काम सुरु होतं. परंतू मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात या उद्यानाचं काम अतिशर संथ गतीने सुरु होतं. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात या कामाला गती आली. नागरिकांसाठी हे उद्यान आजपासून खुलं होतय, याचा आनंद आहे असे शीतल म्हात्रे म्हणल्या.
याप्रसंगी स्थानिक आमदार मनिषा चौधरी, मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार-विभागप्रमुख प्रकाश सुर्वे, नियोजन विभागाच्या संचालक डाॅ. प्राची जांभेकर,परिमंडळ ७ च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे,आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनीश वेंगुर्लेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.