Join us  

लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:12 AM

मते खाण्यासाठी किंवा इच्छुक उमेदवाराला मदत होण्यासाठी तर आपले नशीब आजमवण्यासाठी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात.

मुंबई : मते खाण्यासाठी किंवा इच्छुक उमेदवाराला मदत होण्यासाठी तर आपले नशीब आजमवण्यासाठी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र, मतदार अपक्षांकडे पाठ फिरवतात, हे आकडेवारीवरुन दिसून येते. मुंबई उत्तर पश्चिममध्ये ११ जणांना हजार मतेही मिळालेली नाहीत.

सर्वांचे डिपॉझिट जप्त-

१) २०१४ मध्ये १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी ४ अपक्ष उमेदवार होते. त्यांना एकूण ४,४८९ मते तर चार उमेदवारांना हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. 

२) २०१९ मध्ये  निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी ८ अपक्ष उमेदवार होते. 

३) त्यांना एकूण ६६०२ मते तर दोन उमेदवारांना हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. यामुळे सर्व अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 

यांना सर्वाधिक मते : २०१९ च्या निवडणुकीत प्रभाकर साधू यांना सर्वांत जास्त १९१२ मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत रिना झवेरी यांना १५३० मते मिळाली तर २००९ च्या निवडणुकीत संतोष चाळके यांना १८८६ मते मिळाली.

यांना सर्वांत कमी मते : २०१९ च्या निवडणुकीत विजेंद्र राय यांना सर्वांत कमी ४०७ मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत प्रतीक तोरसकर यांना ५१५ मते मिळाली, तर २००९ च्या निवडणुकीत सतीश कांबळे यांना ५२५ मते मिळाली.

लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ-

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा  निवडणुकीत २००९, २०१४, २०१९ मध्ये हे चित्र कायम होते. या मतदारसंघात अद्याप अपक्ष उमेदवारांना विजय मिळाला नाही. २००९ च्या निवडणुकीत एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी ९ अपक्ष उमेदवार होते. त्यांना एकूण १०१६४ मते तर उमेदवारांना हजारांपेक्षा कमी मते मिळाली.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान