Join us

परीक्षेच्या तोंडावर मातृछत्र हरपले, पण इशिकाने पटकावले ९७% गुण    

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 24, 2023 18:03 IST

प्रवीण जैन आणि दिवंगत बरखाबेन जैन यांची कन्या इशिका जैन हिने आयसीएसई परीक्षा देण्याची तयारी केली.

मुंबई : आयसीएसई परीक्षेच्या ऐन तोंडावर भुलेश्वर येथील श्री चंद्रप्रभा दिगंबर जैन मंदिर आणि श्री आदेश्वर जैन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण जैन यांच्या पत्नी बरखाबेन जैन यांचे आकस्मिक निधन झाले.परंतू मनावर दगड ठेवून त्यांची कन्या इशिका जैन हिने ९७ टक्के गुण पटकावून दिगंबर जैन समाजात आपला जबरदस्त ठसा उमटविला. दिवंगत मातोश्रीची इच्छा पूर्ण केल्याबद्दल इशिकावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

प्रवीण जैन आणि दिवंगत बरखाबेन जैन यांची कन्या इशिका जैन हिने आयसीएसई परीक्षा देण्याची तयारी केली. याच परीक्षेच्या ऐन तोंडावर इशिकाच्या मातोश्री बरखाबेन जैन यांचे आकस्मिक निधन झाले. आईच्या निधनाचे दुःख, कुटुंबावर कोसळलेला दु:खाचा डोंगर याही परिस्थितीत इशिकाने मनाचा दृढ निश्चय करुन परीक्षा दिली. नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि संकटाचा सामना करणाऱ्या इशिकाने चक्क ९७ टक्के गुण मिळवून तिने आपल्या आई वडिलांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

टॅग्स :विद्यार्थीपरीक्षा