Join us
Daily Top 2Weekly Top 5

"न्यायालयात न्यायाची तर वारीत काळजाची भाषा": अँड. उज्ज्वल निकम

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 18, 2024 17:04 IST

वारकऱ्यांच्या टाळ-मृदाच्या गजरात रंगला "आनंदाचे डोही".

मनोहर कुंभेजकर, मुंबई: न्यायालयात आम्ही न्यायाची भाषा बोलतो आणि वारीत काळजाची भाषा ऐकू येते, असे प्रतिपादन अँड उज्ज्वल यांनी काल सायंकाळी केले.

दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीला भक्तीसुमने वाहण्यासाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार यांनी पंडित आनंद भाटे यांच्या अभंग आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम ‘आनंदाचे डोही’ याचे आयोजन केले होते.

आनंद भाटेंच्या स्वर्गीय स्वरातून पंढरीला जाऊ न शकलेल्या सर्व रसिक श्रोत्यांच्या डोळ्यापुढे साक्षात विठ्ठल साकार झाला. ह्या सोहळ्याची सुरवात वारकऱ्यांच्या पारंपारिक ‘जयजय राम कृष्ण हरी’ ने झाली. यावेळी वारकरी दिंडी व पाडूरंगाची पालखी काढण्यात आली. या छोट्याशा दिंडीत मध्ये अँड आशिष शेलार, अँड प्रतिमा शेलार  आणि अँड उज्ज्वल निकम सहभागी झाले.

मृदंग, झांजेवर ताल धरत, नाचत, विठूनामाचा गजर करत वांद्रे रसिक सामिल झाले. यावेळी दरवर्षी वारी करणाऱ्या एका कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना अँड.उज्ज्वल निकम म्हणाले की,काल सकाळ पासून महाराष्ट्रात प्रवासात होतो. ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या दिंड्या भेटल्या, आता ही पुन्हा संध्याकाळी वारकऱ्यांची भेट झाली. आम्ही न्यायालयात न्यायाची भाषा बोलतो आणि मी दिवसभर दिंडीत काळजाची भाषा अनुभवली असे प्रतिपादन त्यांनी केले.

टॅग्स :मुंबईउज्ज्वल निकमआषाढी एकादशी