Join us

कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 11, 2024 17:26 IST

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.  

मनोहर कुंभेजकर, मुंबई : वरळी हिट अँड रनच्या दुर्दैवी अपघातात जीव गममावा लागलेल्या वरळी कोळीवाड्यातील कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी  मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी उपस्थित होते. 

या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश या आधीच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहेत.  कारवाईबाबत कोणतीही हयगय करण्यात येणार नसल्याचे यावेळी मंत्री केसरकर आणि शेवाळे यांनी कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त केले.

टॅग्स :मुंबईदीपक केसरकर वरळी