Join us

अनंत चतुर्दशीसाठी विशेष सेवा; पश्चिम रेल्वेकडून भाविकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 09:36 IST

अनंत चतुर्दशीच्या रात्री चर्चगेट ते विरारदरम्यान विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनंत चतुर्दशीच्या रात्री चर्चगेट ते विरारदरम्यान विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. अप आणि डाऊन मार्गांवर आठ विशेष फेऱ्या चालविल्या जातील. मंगळवारी, १७ सप्टेंबरला गणपतींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरून विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय कमी होणार आहे. 

चर्चगेटवरून विरारसाठी लोकल १ वाजून १५ मिनिटांनी, तर शेवटची लोकल ३ वाजून २० मिनिटांनी सुटेल. विरारवरून चर्चगेटसाठी लोकल रात्री सव्वाबाराला आणि लोकल रात्री ३ वाजता सुटेल. 

लोकलच्या वेळा-

१) चर्चगेट ते विरार : रात्री १:१५, १:५५,  २:५५, ३:२० 

२) विरार ते चर्चगेट : रात्री १२:१५, १२: ४५, १:४०, ३

जास्त वेळ थांबणार-

१) सर्व गाड्या चर्नी रोड स्थानकात नेहमीपेक्षा अधिक वेळ थांबतील. जेणेकरून प्रवासी आरामात चढू आणि उतरू शकतील. 

२) चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान मंगळवारी संध्याकाळी ५  ते रात्री ८:३० या वेळेत ३८ जलद अप लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. 

३) संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी चर्नी रोड स्थानकावर कोणतीही अप धीमी गाडी थांबणार नाही.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेगणेशोत्सव 2024