मरोळ ते साकीनाका भागातील रखडलेल्या पूलांच्या बांधकामांना मुहूर्त मिळेना; नागरिक संतप्त

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 7, 2024 16:29 IST2024-06-07T16:28:52+5:302024-06-07T16:29:54+5:30

मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले आहे.

in mumbai construction of stalled bridges in marol to sakinaka area did not get time citizens are angry | मरोळ ते साकीनाका भागातील रखडलेल्या पूलांच्या बांधकामांना मुहूर्त मिळेना; नागरिक संतप्त

मरोळ ते साकीनाका भागातील रखडलेल्या पूलांच्या बांधकामांना मुहूर्त मिळेना; नागरिक संतप्त

मनोहर कुंभेजकर, मुंबई : मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले असून त्याची दखल कुणीच घेत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये काम न होण्यावरून आपापसात भांडणे तसेच संताप व तणाव अनुभवयाला मिळत आहे. 

यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी  मोर्चा काढून मुंबई महानगरपालिका के पूर्व विभाग कार्यालयावर व नियुक्त केलेल्या कंत्राटाराच्या विरोधात उत्सफूर्त मोर्चा काढला.  त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांनी या पिकनिक पूलाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 

Web Title: in mumbai construction of stalled bridges in marol to sakinaka area did not get time citizens are angry