Join us

तिकीट काढा, नाही तर दंड भरा; फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 10:58 IST

मध्य रेल्वेने २५ आणि २६ जुलैला ऐन गर्दीच्या वेळी विशेष मोहीम राबविण्यात आली.

मुंबई : मध्य रेल्वेच्या वातानुकूलित (एसी) लोकल आणि पहिल्या दर्जाच्या डब्यातून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टीसींनी विशेष मोहिमांद्वारे दणके देण्यास सुरुवात केली आहे.    मध्य रेल्वेने २५ आणि २६ जुलैला ऐन गर्दीच्या वेळी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात २५ जुलैला फुकट्या प्रवाशांची एकूण ३९१ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्याद्वारे एक कोटी २६ लाख ५३० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, २६ जुलैला विनातिकीट प्रवाशांची एकूण ३२४ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यात एक कोटी चार लाख २७५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

एसी लोकलमधून विनातिकीट प्रवाशांमुळे डब्यांत गर्दी वाढते. त्याचा नाहक त्रास तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो. तसेच गर्दीच्या वेळी दादर, भायखळा, कुर्ला या स्थानकांतून माल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. रेल्वेकडून अशा प्रवाशांवर कारवाई केली जाते.

धडधाकट प्रवाशांची अशीही घसुखोरी-

दिव्यांग प्रवाशांसाठी असलेल्या डब्यातूनही धडधाकट प्रवासी करतात. त्यामुळे या डब्यातही नाहक गर्दी होते. त्याचा त्रास दिव्यांग प्रवाशांना होतो.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वे