Join us  

धक्कादायक! मुंबईत ११ महिन्यांत ८७८ जणी विकृत वासनेच्या शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 9:35 AM

दाखल गुन्ह्यांपैकी ८४७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश.

मुंबई : गेल्या ११ महिन्यांत  ५३१ अल्पवयीन मुलींसह ८७८ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. यापैकी ८४७ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. तर, १,०७१ अल्पवयीन मुलींसह एकूण १,०८१ जणी बेपत्ता झाल्या आहेत. अपहरणाच्या दाखल गुन्ह्यांपैकी ९९७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत मुंबईत महिला संबंधित अत्याचाराचे ५ हजार ४१० गुन्हे नोंद झाले. यामध्ये,  ५३१ अल्पवयीन मुलींसह ८७८ महिलांवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी ८४७ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. दाखल गुन्ह्यांपैकी ४६६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये महिला सुरक्षा कक्ष आणि निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली.

विनयभंगाच्या १,९६८ घटना :

मुंबईत गेल्या ११ महिन्यांत विनयभंगप्रकरणी १,९६८ गुन्हे नोंद सोशल मीडिया हाताळताना सतर्क राहण्याच्या सूचना.

मित्र, प्रियकर आणि सोशल मैत्रीच करतेय घात.. 

 गेल्या ३ वर्षांत मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणांकडून सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालातून समोर आली. यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. 

 सोशल मीडिया हाताळताना सतर्क राहण्याच्या सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. 

 अल्पवयीन मुलांना चांगल्या - वाईट स्पर्शाची जाणीव करून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. २३ महिलांवर वडील, भाऊ तसेच मुलाकडून लैंगिक अत्याचाराच्या नात्याला काळिमा फासण्याचा  घटना घडल्या आहेत. 

 नातेवाईक (४२), कुटुंबातील मित्र (५१), लिव्ह इन पार्टनर (९), केअरटेकर (१) अन्य ओळखीच्या व्यक्तीकडून (२८) बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. 

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार...

गेल्या वर्षी याच अकरा महिन्यांत मुंबईत बलात्काराच्या ८८५ घटनांची नोंद झाली. यामध्ये ५४९ गुन्हे हे अल्पवयीन मुलींशी संबंधित होते.  महिलांच्या अपहरणासंबंधित १,०३६  गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी