Join us

महामुंबईत रायगडने रोवला झेंडा, थेट परीक्षेमुळे घसरला निकालाचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 08:41 IST

अनेक नामांकित शिक्षण संस्थांची महाविद्यालये मुंबईमध्ये आहेत. अनेक कोचिंग क्लासेसही महानगर आणि उपनगरांत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विभागाच्या निकालात रायगडने यंदा बाजी मारली असून, अव्वल स्थान पटकावले आहे. मुलींचा निकाल सर्वाधिक लागला असला, तरी निकालाची टक्केवारी मात्र घसरली आहे. कोरोनानंतरच्या काळात यंदा थेट परीक्षा झाल्याने निकालाचा टक्का घसरल्याचे निरीक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. 

अनेक नामांकित शिक्षण संस्थांची महाविद्यालये मुंबईमध्ये आहेत. अनेक कोचिंग क्लासेसही महानगर आणि उपनगरांत आहेत. मात्र, तरीही यंदा मुंबई विभागाचा निकाल कमी लागला आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहिली असता यंदाच्या निकालात मुंबई विभागाने निराशा केली आहे. 

ठाण्यात मुरबाड अव्वलबारावीचा ठाणे जिल्ह्याचा निकाल ८८.९० टक्के लागला आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून, या परीक्षेत मुलींचा निकाल ९१.३६ टक्के इतका लागला. ठाणे जिल्ह्यात मुरबाडचा निकाल सर्वाधिक लागला असून, येथील ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा एकूण निकाल ८८.९० टक्के लागला आहे. यात मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक, तर सगळ्यात कमी ८६.१२ टक्के निकाल उल्हासनगरचा लागला.

गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन...     विद्यार्थ्यांना २६ मे ते ५ जून या कालावधीत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येतील.     उत्तर पत्रिकांच्या झेरॉक्स कॉपीसाठी २६ मे ते १४ जून या कालावधीत महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.

थेट परीक्षा झाल्याने....कोरोनानंतर यंदा प्रथमच शंभर टक्के क्षमतेसह संपूर्ण अभ्यासक्रमांवर सेंटरनुसार बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा निकालाची टक्केवारी कोरोनाच्या खंडित कालावधीनंतर थेट परीक्षा झाल्याने घसरली आहे. शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियानही राबविण्यात आले होते, तर विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यात आल्या होत्या.- नितीन उपासनी, विभागीय अध्यक्ष, मुंबई मंडळ.

 

टॅग्स :बारावी निकाल