अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत होणार सुधारणा

By Admin | Updated: April 5, 2015 01:34 IST2015-04-05T01:34:31+5:302015-04-05T01:34:31+5:30

अकरावी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.

Improvements will be made in the process of 11th online admissions | अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत होणार सुधारणा

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत होणार सुधारणा

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांचा मनस्ताप दूर होण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण आयुक्तांनी पुण्यात तातडीची बैठक घेऊन प्रवेशातील अडचणींचा आढावा घेतला. आॅफलाइन प्रक्रियेतील सुधारणा, चुकीच्या पद्धतीने प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवरील कारवाई , याबाबतही चर्चा झाल्याचे, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या आदेशाचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती.

Web Title: Improvements will be made in the process of 11th online admissions