ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:05 IST2021-07-01T04:05:59+5:302021-07-01T04:05:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमाेनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या ...

Improvement in the health of veteran actor Naseeruddin Shah | ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीत सुधारणा

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीत सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमाेनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

नसीरुद्दीन शाह यांना गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यूमोनियासोबतच त्यांच्या फुप्फुसात पॅच आढळला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. सध्या त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि त्यांची मुले रुग्णालयात त्यांच्यासोबत आहेत. ते लवकरच ठीक होतील, अशी प्रार्थना करूया, असे त्यांच्या व्यवस्थापकांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्यानंतर आता नसीरुद्दीन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

..............................

Web Title: Improvement in the health of veteran actor Naseeruddin Shah