सुधारित...कविता करकरे यांचा करुण अंत

By Admin | Updated: September 29, 2014 23:14 IST2014-09-29T23:14:28+5:302014-09-29T23:14:28+5:30

सुधारित बातमी....

Improved ... Kara Karkare's Karuna End | सुधारित...कविता करकरे यांचा करुण अंत

सुधारित...कविता करकरे यांचा करुण अंत

धारित बातमी....

सुधारित...कविता करकरे यांचा करुण अंत

कविता करकरे यांचा करुण अंत
मृत्यूनंतर दिले ६ जणांना जीवनदान
मुंबई:
सहा वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या दशहतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. कविता यांचा मेंदू मृतावस्थेत असला तरीही इतर अवयव मात्र कार्यरत होते. त्यामुळेच त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांचे डोळे, किडनी, यकृत आणि त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या निर्णयामुळे ६ जणांना जीवनदान मिळाले आहे.
कविता या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली जुई, सायली आणि मुलगा आकाश असा परिवार आहे. दहशतवाद्यांना कंठस्थान घालत वीर मरण पत्करलेल्या हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता तितक्याच धैर्यशील आणि खंबीर स्वभावाच्या होत्या. हेमंत करकरे यांच्या पश्चात समोर आलेल्या परिस्थितीचा त्यांनी धीरोदात्तपणे सामना केला. कसाबला सोडून द्या, दहशतवाद मुळापासून नष्ट होणे जास्त गरजेचे असल्याचे मत तेव्हा त्यांची मुलगी सायलीने व्यक्त केले होते. दु:खाचा डोंगर कोसळूनही न डगमगता कविता यांनी आयुष्याची वाटचाल सुरुच ठेवली होती. शनिवारी मात्र घरातच पडून त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि त्या कोमात गेल्या.
बेशुद्धावस्थेतच शनिवारी सकाळी त्यांना माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळेपासूनच त्या बेशुद्धावस्थेत होत्या. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे हृदयाचे कार्य नियमित सुरू राहण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. यानंतर कविता करकरे यांच्या इतर काही तपासण्या करण्यात आल्यावर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटलवर ठेवण्यात आले होते. काहीतरी चमत्कार होईल आणि त्यांच्यात सुधारणा होईल, असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना आणि डॉक्टरांना वाटत होता. मात्र मंगळवार सकाळपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून आली नाही. यानंतर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यानंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.
यावेळी त्यांची तिन्ही मुले तिथेच होती. आई गेली, मात्र ज्यांना अवयवांची गरज आहे, त्यांना मदत व्हावी, याच हेतूने आईच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय तिन्ही मुलांनी मिळून घेतला. कविता करकरे यांचे डोळे, त्वचा, यकृत, किडनी हे अवयव दान करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
.......................
(चौकट)
कविता करकरे यांचे यकृत कोकिलाबेन रुग्णालयात देण्यात आले आहे. एक किडनी हिंदुजा रुग्णालयातच देण्यात आली असून दुसरी किडनी ही जसलोक रुग्णालयाला देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.

Web Title: Improved ... Kara Karkare's Karuna End

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.