सुलभ विजयासाठीच फाटकांना केले इम्पोर्ट
By Admin | Updated: August 16, 2014 22:53 IST2014-08-16T22:53:46+5:302014-08-16T22:53:46+5:30
भगव्या एकनाथांनी ‘नाथा घरची उलटी खूण’ वाटावी अशी रवींद्र फाटक यांना सेनेत आणण्याची केलेली चाल पाहावी अशी चर्चा शिवसेनेत सुरू आहे.

सुलभ विजयासाठीच फाटकांना केले इम्पोर्ट
>ठाणो : पक्षहित साधल्याचा देखावा, स्वत:च्या पुन्हा आमदारकीची निश्चिती आणि भविष्यात वरचढ ठरू शकणा:या सहका:यांचा कार्यक्रम करणो, अशी हॅट्ट्रिक करणारी खेळी कशी खेळावी? हे पाहायचे असेल तर भगव्या एकनाथांनी ‘नाथा घरची उलटी खूण’ वाटावी अशी रवींद्र फाटक यांना सेनेत आणण्याची केलेली चाल पाहावी अशी चर्चा शिवसेनेत सुरू आहे.
आपला बाहुबली प्रतिस्पर्धी आपल्या मार्गातून दूर करताना नाथांनी त्याला राजन विचारे खासदार झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या ठाणो शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, अशीही फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे माजी आमदार व शिवसेना उपनेते अनंत तरे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यावरही हात चोळीत बसण्याची पाळी आणली.
ज्या म्हस्केंनी शिंदेंच्या पुत्रच्या विजयासाठी जीवाचे रान केले त्यांच्याच आमदारकीच्या उमेदवारीवर या एकनाथांनी एकच घाव घातला. त्यामुळे आता रवींद्र यांच्या शिंदेकृत शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेत असंतोषाचे फाटक खुले झाले
आहे. जर इम्पोर्टेड नेत्याला या नाथांनी आमच्यावर लादले तर
विजय चौगुलेंचे जे नवी मुंबईत झाले त्याची पुनरावृत्ती ठाण्यात घडेल,
असा इशारा आताच खाजगीत
जुने-जाणते शिवसैनिक देत
आहेत.
एका ज्येष्ठ शिवसैनिकाने लोकमतशी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादीतील एका दबंगाला काही महिन्यापूर्वी शिवसेनेत आणून मी पस्तावलो. अशीच वेळ काही महिन्यांनी या नाथांवर आल्याशिवाय राहणार नाही. जो निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘कार्यक्रम’ करण्याचे कारस्थान करतो त्यांना केवळ शिवसैनिकांचे नव्हे तर भगव्याचे आणि स्व. शिवसेनाप्रमुखांचा तळतळाट भोवल्याशिवाय राहत नाही. राणो आणि गणोश नाईक ही त्याची शिवसेनेबाहेरील उदाहरणो आहेत. परंतु आता तसेच एखादे उदाहरण यांच्या रूपाने शिवसेनेतही साकार होईल. हे भारुडय़ा नाथांनी विसरू नये. (विशेष प्रतिनिधी)
1हे भगवे एकनाथ कोपरी पाचपाखाडीचे सध्या आमदार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने मनोज शिंदे यांच्यासारखे उमेदवार दोन वेळा उभे केले. त्याचा खात्मा या एकनाथांनी दोनही वेळा सहज केला आहे. परंतु या वेळी काँग्रेसने राणो समर्थक बाहुबली व लक्ष्मीपती रवींद्र फाटक यांना या मतदारसंघातून उभे करण्याचे जवळजवळ निश्चित केले होते.
2राणोंनी श्रेष्ठींकडून फाटकांची उमेदवारी पक्की करून घेतली होती. आपण गेल्या दोन निवडणुकीत जितक्या सहजपणो मनोज शिंदेंना चिरडून टाकले. तितक्या सहजपणो फाटकांचे आव्हान पेलता येणार नाही.
3कदाचित ते आपल्याला मतांच्या राजकारणात भारी पडू शकतात. याचा अंदाज आल्याने या एकनाथांनी आपल्याला आव्हान देण्याची क्षमता असलेल्या फाटकांना निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत आणले व एकापरीने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपला विजय निश्चित केला.