आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना मंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन

By महेश गलांडे | Published: February 27, 2021 05:06 PM2021-02-27T17:06:35+5:302021-02-27T17:07:37+5:30

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे

Important appeal of the Minister of Health Rajesh Tope to the candidates appearing for the examination of the Health Department | आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना मंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन

आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना मंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे

मुंबई - राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांत परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका पत्राद्वारे परीक्षार्थींना आवाहन केलंय. परीक्षार्थींनी धीर देण्याचा आणि गुणवत्तेलाच प्राधान्य असल्याचा विश्वास देण्याचं काम टोपे यांनी केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांनी एका पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे.  

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांन केलंय. 

राज्याच्या आरोग्य विभागाने २०१९ मध्ये ५२ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. तसेच उमेदवारांना पद भरतीच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणा-या विविध पदांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.त्यासाठी प्रत्येक आरोग्य विभागाकडून ३५० शुल्कही आकारण्यात आले. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ५ ते ६ पदांसाठी अर्ज केले आहेत. कोरोना कालावधीत या विभागाकडून जाहिरात निघाली नाही, त्यामुळे परीक्षाही घेण्यात आल्या नव्हत्या. अखेर, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने जाहिरात काढून परीक्षेची भरतीप्रक्रिया राबवली. त्यानुसार, उद्या रविवार 28 फेब्रुवारी रोजी राज्यभरात 5 हजार जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. 

 

दोन जिल्ह्यातील परीक्षा केंद्रामुळे झाला घोळ

दरम्यान, यापूर्वी उमेदवारांना दोन पदांसाठी अर्ज करता येईल, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार उमेदवारांनी दोन पर्यायांची निवड केली.उमेदवांना परीक्षांचे प्रवेशपत्र २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन उपलब्ध झाले. त्यात दोन्ही परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी होणार असून दोन्ही पदांच्या परीक्षेच्या वेळा, उमेदवारांचे नाव, बैठक क्रमांक सारखे देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षा केंद्र दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत.  एकाच वेळी दोन ठिकाणी परीक्षा देणे शक्य नसल्याने गोंधळाने निर्माण झाला आहे. 
 

Web Title: Important appeal of the Minister of Health Rajesh Tope to the candidates appearing for the examination of the Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.