Join us  

UPSC निकालातून 'सारथी'चं महत्त्व अधोरेखित झालं, संभाजीराजेंनी दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 2:21 PM

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर सारथीचा मुद्दा चांगलाच पुढे आला होता. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

ठळक मुद्देमराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर सारथीचा मुद्दा चांगलाच पुढे आला होता. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

मुंबई - लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षा २०२० चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. बिहारचा शुभम कुमार परीक्षेत पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतली आहे. तर, जागृती अवस्थी परीक्षेत दुसरी आली आहे. तिनं MANIT भोपाळमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग) केलं आहे. यंदाच्या युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का चांगलाच वाढल्याचे दिसून आले. तब्बल 100 हून अधिक मराठी विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत यश संपादन केलं आहे. त्यामध्ये, सारथीच्या माध्यमातून तयारी करणारे 21 विद्यार्थी या यशस्वी झाले हे विशेष आहे. 

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर सारथीचा मुद्दा चांगलाच पुढे आला होता. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी, विविध योजनाही लागू केल्या. यासाठी, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेत हा विषय लावून धरला होता. त्यासंदर्भात, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठकाही झाल्या होता. आता, युपीएससी परीक्षेचा निकाल पाहिल्यानंतर, त्यात सारथीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश पाहिल्यानंतर संभाजीराजेंनी आनंद व्यक्त केला आहे. 

संभाजीराजेंनी ट्विट करुन, सारथीच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या 21 उमेदवारांनी युपीएससी परीक्षा पास केल्याचे सांगतिले. तसेच, सारथीचं महत्त्व आज अधोरेखित झालं, म्हणूनच माझा सारथीसाठी लढा... असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. 'सारथी' मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना UPSC सारख्या परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, हे यातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्था देखील महत्त्वाची आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. याचसाठी सारथी संस्थेच्या विकासाकरिता मी लढा देत आहे, असेही त्यांनी सांगितले.   

मृणाल जोशी राज्यात पहिली

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ७६१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे. मृणाल जोशी हिने देशात ३६ वी रँक मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर, विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांनी देशात पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवत राज्यात दोन ते 5 वा क्रमांक पटकावला आहे.  

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीकेंद्रीय लोकसेवा आयोगपरीक्षामुंबईमराठा आरक्षण