इमान आता बिझनेस क्लासने परतणार

By Admin | Updated: April 28, 2017 03:24 IST2017-04-28T03:24:12+5:302017-04-28T03:24:12+5:30

जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असणारी इजिप्तची इमान उपचारांसाठी कार्गो विमानाने भारतात दाखल झाली. ५०० किलो

Imaan will now return to business class | इमान आता बिझनेस क्लासने परतणार

इमान आता बिझनेस क्लासने परतणार

मुंबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असणारी इजिप्तची इमान उपचारांसाठी कार्गो विमानाने भारतात दाखल झाली. ५०० किलो वजन असलेल्या इमानचे उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर आताचे वजन १७६ किलो एवढे आहे. त्यामुळे आता ती सामान्य प्रवाशाप्रमाणे भविष्यातील फिजिओथेरपीच्या उपचारांसाठी विमानाच्या बिझनेस क्लासहून अबुधाबीला लवकरच रवाना होणार आहे.
इमानची प्रकृती स्थिर असल्याचे सैफी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. आता भविष्यातील मज्जासंस्था आणि फिजिओथेरपीच्या उपचारांकरिता इमान लवकरच अबुधाबीच्या बुर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे. या रुग्णायलयाविषयी इमानच्या कुटुंबियांना डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सल्ला दिला होता, अशी माहिती सैफी रुग्णालयाच्या डॉ. अर्पणा भास्कर यांनी दिली.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी सैफी रुग्णालयात इमानची भेट घेतली. त्याचप्रमाणे, यावेळी डॉ. मुफ्फझल लकडावाला आणि रुग्णालयाचे चिफ आॅपरेटिंग आॅफिसर हुझेफा शैहाबी यांच्याशी भेटून चर्चा केली. यावेळी, डॉ. सावंत यांनी इमानच्या तब्येतीत झालेल्या सुधारणेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच, यावेळी इमानची बहीण शायमान हिने डॉ. लकडावाला आणि रुग्णालय प्रशासनावर केलेल्या आरोपांविषयी खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, इमानच्या उपचारांमधील सुधारणा विविध वैद्यकीय अहवालातून दिसते आहे. शिवाय, तिच्यावर जलदगतीने उपचार व्हावेत यासाठी विविध यंत्रणांनी वेळोवेळी मदत केली आहे. अशा वक्तव्यांमुळे भविष्यातील वैद्यकीय पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे डॉक्टर आणि रुग्णालयावर आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Imaan will now return to business class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.