I'm grateful ..; When President Meets Lata Mangeshkar | मी कृतज्ञ आहे..; जेव्हा राष्ट्रपती गानसम्राज्ञीला भेटतात..
मी कृतज्ञ आहे..; जेव्हा राष्ट्रपती गानसम्राज्ञीला भेटतात..

ऑनलाईन लोकमत
मुंबई: एक कायदेपंडित तर दुसरी गानसम्राज्ञी.. दोघांनीही एकमेकांना आरोग्याच्या शुभेच्छा देत आपली कृतज्ञता व्यक्त केली.. हा प्रसंग होता, लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी रविवारी सकाळी घडलेला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लतादीदींची भेट घेऊन त्यांची चौकशी करण्याचा.
राष्ट्रपती खुद्द माझ्या निवासस्थानी आले व त्यांनी माझी चौकशी केली यामुळे मी गौरवान्वित झाले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत दीदींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
लतादीदी या भारताचा अभिमान आहेत, त्यांच्या सुरील्या आवाजाने आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळत राहिली आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

 


Web Title: I'm grateful ..; When President Meets Lata Mangeshkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.