अवैध दारू विक्री : दोघांना अटक
By Admin | Updated: May 8, 2015 23:23 IST2015-05-08T23:23:14+5:302015-05-08T23:23:14+5:30
तुर्भे एमआयडीसीमधील इंदिरानगर परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणी मदनसिंग व तनवीर शेख यांना अटक करण्यात आली.

अवैध दारू विक्री : दोघांना अटक
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील इंदिरानगर परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणी मदनसिंग व तनवीर शेख यांना अटक करण्यात आली. दारूचा साठा व रोख रक्कम असा ३७ हजार ६२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी या परिसरात धाड टाकण्यात आली. मदनसिंग व रिक्षाचालक तनवीर शेख यास मद्यविक्री करत असताना अटक केली. हे दोघे मुन्ना लामा याला दारू पुरविण्याचे काम करत होेते. लामा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)