प्रचाराचे अवैध होर्डिग्ज पालिकांच्या अंगाशी!
By Admin | Updated: October 30, 2014 02:08 IST2014-10-30T02:08:53+5:302014-10-30T02:08:53+5:30
निवडणुकीच्या प्रचारासाठी लागलेले अवैध होर्डिग्ज न काढणा:या महापालिका व नगरपालिकांवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केल़े

प्रचाराचे अवैध होर्डिग्ज पालिकांच्या अंगाशी!
आदेशाची पायमल्ली : अवमानतेच्या कारवाईचा हायकोर्टाने दिला इशारा
अमर मोहिते - मुंबई
निवडणुकीच्या प्रचारासाठी लागलेले अवैध होर्डिग्ज न काढणा:या महापालिका व नगरपालिकांवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केल़े
प्रचारासाठी लागणारे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी सर्व पालिका व नगरपालिकांनी विशेष मोहीम राबवावी व असे होर्डिग्ज लावणा:या राजकीय पक्षांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी़ तसेच अवैध होर्डिग्ज काढण्याची मोहीम निवडणुकीच्या निकालानंतर 1क् दिवस सुरू ठेवावी, असे आदेश न्यायालयाने 3क् सप्टेंबरला दिले होत़े मात्र या आदेशाची अंमलबजावणी सर्वच महापालिकांनी केलेली नाही़ कारण अजूनही काही अवैध होर्डिग्ज ठिकठिकाणी लागलेले आहेत़ तेव्हा प्रचाराचे अवैध होर्डिग्ज सर्व पालिका व नगरपालिकांनी काढले की नाही, हे जाणून घेण्यासाठी न्यायालयाने यावर तात्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकत्र्याचे वकील उदय प्रकाश वारुंजीकर यांनी न्या़ अभय ओक व न्या़ अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर केली़
त्यावर न्यायालय म्हणाले, की न्यायालयाच्या आदेशाची अंमजलबजावणी न करणा:या पालिका व नगरपालिकांवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई करण्याव्यतिरिक्त आमच्याकडे पर्याय नाही़ कारण प्रशासनांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय अवैध होर्डिग्जवर कारवाई होणारच नाही़
युद्धपातळीवर कारवाई होण्यासाठी वकिलांनी स्वत:हून पुढे येऊन याची जबाबदारी घ्यायला हवी़ आणि प्रायोगिक तत्त्वावर किमान दोन पालिकांसाठी अशा वकिलांची नेमणूक केली पाहिजे, असे मत न्यायालयाने या वेळी व्यक्त केल़े त्यावर ही जबाबदारी घेणा:या वकिलांची काही नावे आपण सुचवू असे अॅड़ प्रकाश वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितल़े न्यायालयाने बुधवारी यावर सुनावणी ठेवली आह़े
अवैध होर्डिग्ज लागल्याने शहर विद्रूप होते, याबाबत नागरिकांनाच काही पडलेले नाही़ हेल्पलाइन नंबर देऊनही अवैध होर्डिग्जच्या तक्रारी नोंदवल्या जात नाहीत़ तेव्हा आता पालिकाहद्दीत एका वकिलाची नेमणूक करून बेकायदा होर्डिग्ज काढण्याची कारवाई युद्धपातळीवर करावी लागेल़