पालिकेच्या मैदानावर उभारलेला बेकायदेशीर क्रिकेट टर्फ उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:07 IST2021-03-10T04:07:53+5:302021-03-10T04:07:53+5:30

बोरीवली पोलिसात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवली पूर्वच्या साईबाबानगर येथे पालिकेच्या मैदानावर अनधिकृृतपणे क्रिकेटचा टर्फ उभारण्यात ...

Illegal cricket turf erected on municipal grounds demolished | पालिकेच्या मैदानावर उभारलेला बेकायदेशीर क्रिकेट टर्फ उद्ध्वस्त

पालिकेच्या मैदानावर उभारलेला बेकायदेशीर क्रिकेट टर्फ उद्ध्वस्त

बोरीवली पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोरीवली पूर्वच्या साईबाबानगर येथे पालिकेच्या मैदानावर अनधिकृृतपणे क्रिकेटचा टर्फ उभारण्यात आला होता. या प्रकरणी मंगळवारी पालिका आर. मध्य विभागाने धडक कारवाई करीत संपूर्ण टर्फ जमीनदोस्त केला. या प्रकरणी कुणाल केरकर नामक व्यक्तीविरोधात बोरीवली पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला.

बोरीवलीच्या शिपोंली विभागात पालिकेचे आरक्षित मैदान आहे. ज्यावर केरकर याने बेकायदेशीर क्रिकेट टर्फ उभारून व्यवसाय थाटला होता. नागरिकांसाठी मोफत असलेल्या या मैदानाचा वापर तो आर्थिक फायद्यासाठी करीत होता. याबाबत आर. मध्यच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांना समजताच त्यांनी ही धडक कारवाई केली. कापसे यांच्या आदेशानुसार साहाय्यक अभियंते राजेश अक्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी कारवाई करीत सर्वसामान्यांसाठी मैदान मोकळे करून दिले. या प्रकरणी केरकर आणि त्याच्या साथीदारांवर बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Illegal cricket turf erected on municipal grounds demolished