Join us

लोणावळ्यातील बिग बॉसच्या घराचं अनधिकृत बांधकाम, चित्रीकरणाचा परवाना रद्द करण्याची नगरपरिषदेची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:28 IST

सिनेसृष्टीतील स्पर्धक, त्यांना मिळणारे विविध टास्क आणि त्यापेक्षा सेलिब्रेटींमधील वाद यामुळे चर्चेत असणारा शो 'बिग बॉस' वादात अडकला आहे.

ठळक मुद्देसिनेसृष्टीतील स्पर्धक, त्यांना मिळणारे विविध टास्क आणि त्यापेक्षा सेलिब्रेटींमधील वाद यामुळे चर्चेत असणारा शो 'बिग बॉस' वादात अडकला आहे. शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे.

लोणावळा- सिनेसृष्टीतील स्पर्धक, त्यांना मिळणारे विविध टास्क आणि त्यापेक्षा सेलिब्रेटींमधील वाद यामुळे चर्चेत असणारा शो 'बिग बॉस' वादात अडकला आहे. शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे.लोणावळ्यामध्ये असलेल्या बिग बॉसच्या घरासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत घरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा आरोप बिग बॉसवर ठेवण्यात आला आहे.

तीन वर्ष होऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. तसंच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उभारलेला नाही. याशिवाय अग्निशमन यंत्रणा तसंच कर्मचारी इथे नाहीत. त्यामुळे बिग बॉसच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेच्या चौकशी अहवालात करण्यात आली आहे. 

टॅग्स :बिग बॉस ११