आयआयटीअन्सची धम्माल-मस्ती
By Admin | Updated: December 21, 2015 01:41 IST2015-12-21T01:41:56+5:302015-12-21T01:41:56+5:30
आयआयटी कॅम्पसमध्ये ‘मूड इंडिगो’ सांस्कृतिक महोत्सवाचा तिसरा दिवसही रविवारी जोश आणि उत्साहात संपन्न झाला.

आयआयटीअन्सची धम्माल-मस्ती
मुंबई: आयआयटी कॅम्पसमध्ये ‘मूड इंडिगो’ सांस्कृतिक महोत्सवाचा तिसरा दिवसही रविवारी जोश आणि उत्साहात संपन्न झाला. यावेळी ‘नृत्याजंली फिनाले’, ‘हवाईन लाँच’, तालमेल फिनाले’ ‘स्पीड डेटिंग’ या कार्यक्रमांना तूफान गर्दी झाली.
यावेळी लिटफेस्टसाठी समाजसेविका मेधा पाटकर आणि नेते शशी थरुर उपस्थित होते. मेधा पाटकर यांनी ‘जागतिकीकरण : धोका की संधी’ या विषयावर आपली मते मांडली. तर शशी थरुर यांनी ‘नेटवर्कींग क्षेत्रात भारताचे सद्यस्थितीत स्थान’ या विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी ट्विटरच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे थरुर यांनी दिली.
शिवाय ‘ह्युमरफेस्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खळखळून हसवण्याचे काम स्टँडअप कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी केले. यावेळी कुरेशी यांनी आपल्या शायरी सादर करुन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
‘आजपर्यंत भारताने सगळ््या देशांनी बनवलेले नियम पाळले आता नियम भारताने बनवायला हवे आणि ते सगळ््यांनी पाळायला हवे.’असे मत नेते शशी थरुर यांनी लिट फेस्टवेळी केले. यावेळी ‘नेटवर्कींग क्षेत्रात भारताचे सद्यस्थितीत स्थान’ याविषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आणि जगात टिकाव धरण्यासाठी तरुणांनी काय करायला हवे याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.
या व्यतिरिक्त लिटफेस्टसाठी मेधा पाटकरही उपस्थित होत्या. मेधा पाटकर यांनी ‘जागतिकीकरण : धोका की संधी’ या विषयावर आपली मते मांडली. यावेळी त्यांनी देशात झालेल्या अनेक सामाजिक सुधारणांवर प्रकाश टाकला आणि त्याचा पूर्ण जगावर कसा परीणाम झाला हे त्यांनी समजावून सांगितले.
रंगली
नृ्त्यांजली स्पर्धा
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बहारदार नृत्याचे सादरीकरण केल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी या स्पर्धेचा फिनाले राऊंड देखील तितकाच रंगला.
बुक कार्विंग
बुक कार्विंग हा अनोखा कलाविष्कार यावेळी सगळयांचेच आकर्षण ठरला. बुक वर करण्यात आलेली कार्वींग इतकी सुंदर होती की अनेकांना फोनमधून फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.
चित्रकला
स्पर्धेचे आयोजन
महोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या चित्रस्पर्धेलाही मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. वेगळी चित्र काढण्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी लुटला.