‘मूड’च्या फिव्हरमध्ये रंगले आयआयटीयन्स!

By Admin | Updated: December 22, 2015 00:55 IST2015-12-22T00:55:32+5:302015-12-22T00:55:32+5:30

गेले चार दिवस आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. यातील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी धम्माल केली

Iitians played in the 'Mood' Fever! | ‘मूड’च्या फिव्हरमध्ये रंगले आयआयटीयन्स!

‘मूड’च्या फिव्हरमध्ये रंगले आयआयटीयन्स!

मुंबई : गेले चार दिवस आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. यातील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी धम्माल केली आणि वर्षभराचा ताण चार दिवसांत झटकून पुढील वर्षभरासाठी स्वत:ची बॅटरी चार्ज केली.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘शीज गॉट लूक’ ही सौंदर्य स्पर्धा चांगलीच रंगली. या स्पर्धेत विविध राज्यांतील तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण मिस्टर इंडिया २०१५ रोहित खंडेलवाल आणि प्रतीक गुजराल यांनी केले. या वेळी स्पर्धेच्या वातावरणाला हलके करण्यासाठी दोन्ही परीक्षकांनी रॅम्पवर येऊन तरुणींना प्रोत्साहित करण्याचे काम केले. विशेष म्हणजे या स्पर्धेतील विजयी तरुणीला थेट मिस इंडियाच्या निवड चाचणीत थेट प्रवेश दिला जाणार आहे.
ह्युमर फेस्टच्या निमित्ताने विनोदवीर वीर दास उपस्थित होता. आपल्या सादरीकरणातून त्याने आयआटीयन्सना लोटपोट हसवले. त्यामुळे सभागृह हशा आणि टाळ्यांनी भरून गेला.
खवय्यांसाठी असलेल्या फुड फेस्टला सुप्रसिद्ध शेफ रणबीर ब्ररार उपस्थित होता. या वेळी रणवीरने अनेक पदार्थ करून दाखविले. या वेळी रणवीरने आपला शेफ प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. तसेच या वेळी एक शिबिरही घेण्यात आले.
परदेशी बॅण्डची हजेरी
विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी परदेशी बॅण्डही आले होते. परदेशी बॅण्डच्या गाण्यावर अनेकांनी ताल धरला आणि रॉक संगीताची मजा लुटली.
‘हेल्थ फंडा’
लिटफेस्टसाठी पाहुण्या म्हणून बेस्ट एशियन कुकबुक अ‍ॅवॉर्ड वीनर नीता मेहता आल्या होत्या. या वेळी त्यांनी विविध खाद्यपदार्थांवर चर्चा केली आणि सुदृढ शरीरासाठीच्या महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दिल्या. तसेच या वेळी विद्यार्थ्यांच्या हेल्थविषयीच्या अनेक शंकांचे निरसन त्यांनी केले.
‘पॉप्युलर नाइट’ची धम्माल
महोत्सवाचा सर्वात हाय पॉइंट ठरली ती ‘पॉप्युलर नाइट’. यात एकाच वेळी विद्यार्थ्यांना गायक आणि संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती, गायक नेहा कक्कर, जावेद अली, आदिती शर्मा, अमित मिश्रा, नाकेश अजाज, अंतरा मिश्रा यांना एकत्र ऐकण्याची संधी मिळाली. यात आयआयटीयन्सनी धम्माल केली.

Web Title: Iitians played in the 'Mood' Fever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.