Join us  

आयआयटी मुंबईचे विद्यार्थी पुन्हा परतले संकुलात, वसतिगृहात राहण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 2:38 AM

IIT Mumbai students return to campus : कोरोनाचा प्रभाव मुंबईसह देशभरात कमी होत असल्याने मागील अकरा महिन्यांपासून आयआयटी मुंबई मधील विद्यार्थी आपल्या गावी गेलेले तब्बल दोन हजाराहून अधिक विद्यार्थी आता आयआयटी मुंबईत आपल्या शिक्षण आणि संशोधनसाठी परतले आहेत.

मुंबई :  कोरोना प्रादुर्भावामुळे शांत झालेले आयआयटी मुंबई चे संकुल हळूहळू पुन्हा गजबजत आहे. आयआयटी मुंबई प्रशासनाने लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना आपापल्या मूळ गावी, घरी परतायला सांगितल्यानंतर तब्बल १० ते ११ महिन्यांनी २ हजाराहून अधिक विद्यार्थी आपल्या संशोधनातील शिक्षणासाठी आयआयटीमध्ये परतत असून प्रशासनाने ही वसतिगृहातील विदयार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था मान्य करून परवानगी दिली असल्याचे कळविण्यात आले आहे.कोरोनाचा प्रभाव मुंबईसह देशभरात कमी होत असल्याने मागील अकरा महिन्यांपासून आयआयटी मुंबई मधील विद्यार्थी आपल्या गावी गेलेले तब्बल दोन हजाराहून अधिक विद्यार्थी आता आयआयटी मुंबईत आपल्या शिक्षण आणि संशोधनसाठी परतले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे शेवटचे वर्ष आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यातील हे विद्यार्थी आहेत. परतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे आयआयटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आत्तापर्यंत आयआयटी बॉम्बेतील सर्व अभ्यासक्रम हे ऑनलाइन आणि इतर त्याच धर्तीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहेत. आता महाराष्ट्रात विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू होत असल्याने आयआयटी मुंबईतील पूर्ण वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याची तयारी केली आहे. स्थानिक प्रशासनाने आदेश दिल्यानंतर हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. यामुळे जे विद्यार्थी आपल्या गावाहून आयआयटी मुंबईतील वसतिगृहात पोहचले आहेत, त्यांना कोरोनाचे नियम पाळून आणि त्यासाठीची काळजी घेऊन त्याचे प्रत्यक्ष वर्ग सुरू केले जाण्याची शक्यता आहे. 

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आपल्या प्रकल्पावर खूप वेळ  द्यावा लागतो. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही नाही. म्हणून आयआयटी प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहात राहण्याची आणि उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा आदी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.- सुभाशिष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई  

टॅग्स :आयआयटी मुंबई