Join us  

आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये ३६१ कंपन्यांकडून तब्बल १,१२२ ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 6:32 AM

पहिला टप्पा पूर्ण : नवतरुणांना मिळाले कोट्यवधींचे पॅकेज

मुंबई : भरघोस पगारासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे आयआयटीयन्सना मिळणारे कोट्यवधीचे पॅकेजेस या वेळीही पहायला मिळाले. प्री-प्लेसमेंट्स आॅफर्स आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य म्हणून समोर आले आहे. पहिल्या टप्प्याच्या प्लेसमेंट प्रक्रियेत आत्तापर्यंत निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्यांनी आपला सहभाग दाखविला आहे. प्लेसमेंट्सच्या आॅफर्स मिळून आतापर्यंत १,१२२ विद्यार्थ्यांना या कंपन्यांकडून आॅफर्स मिळाल्याची माहिती आयआयटीकडून मिळाली आहे. पुढच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या पुष्टीनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात यंदा सगळ्यात जास्त आॅफर्स विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असून, यामध्ये सॅमसंगने सगळ्यात जास्त म्हणजे २७ आॅफर्स देऊ केल्या आहेत. प्लेसमेंट्च्या पहिल्या दिवशी कंपन्यांमध्ये हुशार विद्यार्थ्यांना आॅफर्स देण्यासाठी चुरस दिसून आली. पहिल्या दिवशीही एकूण २०० आॅफर्स देण्यात आल्या. त्यामधील १८३ आॅफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दुसºया दिवशी २३७ आॅफर्स कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यामधील २१० आॅफर्सचा स्वीकार विद्यार्थ्यांकडून झाला आहे. यामध्ये भारतासह आंतरराष्ट्रीय कंपन्यांचाही सहभाग होता. अमेरिका, जपान, नेदरलँड, सिंगापूर, तैवान, साउथ कोरिया अशा देशांनी एकूण ८९ आॅफर्स विद्यार्थ्यांना देऊ केल्या आहेत.प्रतिवर्ष ४५ लाख रुपये ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी डोमेस्टिक आॅफर असून, आंतरराष्ट्रीय आॅफर्समध्ये प्रतिवर्ष १. ६४ लाख यूएसडी डॉलरही आॅफर मोठी मानली जात आहे.दुसरा टप्पा जानेवारी महिन्यातआयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये १ डिसेंबरपासून कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात झाली होती. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १७ डिसेंबरपर्यंत याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्लेसमेंटचा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये असून, विद्यार्थ्यांची कॉमन अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट यंदा घेतली जाणार आहे. ३०हून अधिक कंपन्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट कारण्यासाठी या चाचणीच्या निकालाचा वापर करणार आहेत.

टॅग्स :आयआयटी मुंबईमुंबई