लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयआयएम मुंबईच्या पहिल्या बॅचमधील ९९.४० टक्के विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाली. या २०२४-२०२६ बॅचमधील एका विद्यार्थ्याला वार्षिक ७१.४ लाखाचे सर्वोच्च पॅकेज मिळाले. मध्य पूर्वेतील यूएईत कामासाठी त्याला पॅकेज मिळाले आहे. तसेच गेल्यावर्षीच्या ५४ लाख रुपयांच्या पॅकेजच्या तुलनेत यात भरीव वाढ झाली आहे.
पवईतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग संस्थेचे अडीच वर्षांपूर्वी आयआयएम मुंबईमध्ये रुपांतरण झाले. आयआयएमचा दर्जा मिळाल्यानंतर संस्थेत २०२४ मध्ये पहिली बॅच प्रवेशित झाली होती. त्यानंतर संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीद्वारे नोकरी देण्यासाठीही कंपन्यांचा ओघ वाढला आहे. यंदा रा २०० हून अधिक कंपन्या कॅम्पस निवडीत सहभागी झाल्या. या कंपन्यांनी ५०५ विद्यार्थ्यांपैकी ५०२ जणांना ऑफर्स दल्या. यातील ३ विद्यार्थ्यांनी स्वतःच व्यवसाय करण्याचे ठरविल्याने त्यांनी कंपन्यांच्या ऑफर्स स्वीकारल्या नाहीत.
फायनान्सचा दबदबाआयआयएमच्या प्लेसमेंटमध्ये यंदा बँकिंग आणि फायनान्स क्षेत्राचा दबदबा राहिला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. बँकिंग व फायनान्स या क्षेत्रातील प्लेसमेंटमध्ये यंदा सर्वाधिक ३३ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर कन्सल्टिंग क्षेत्रात १२३ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर्ससह देण्यात आल्या आहे. एफएमसीजी या क्षेत्रात २४ टक्क्यांनी वाढ झाली.
या प्रमुख कंपन्यांनी दिल्या नोकऱ्याॲक्सेंचर स्ट्रॅटेजी, ॲमेझॉन, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, मायक्रोसॉफ्ट, गोल्डमन सॅक्स, जे.पी. मॉर्गन चेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, नेस्ले आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपन्यांचा समावेश आहे. यंदा पहिल्यांदाच येणाऱ्यांमध्ये बिर्ला पिव्होट, डॉ. लाल पॅथलॅब्स, पॉलिसी बाजार, शादीडॉट कॉम आणि सिरीयस एआय यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
Web Summary : IIM Mumbai's first batch saw 99.4% placement, with the highest package at ₹71.4 lakhs in UAE. Over 200 companies recruited 502 students. Finance dominated, with 33% growth. Top recruiters included Accenture, Amazon, and Reliance.
Web Summary : आईआईएम मुंबई के पहले बैच में 99.4% प्लेसमेंट, यूएई में ₹71.4 लाख का उच्चतम पैकेज मिला। 200 से अधिक कंपनियों ने 502 छात्रों की भर्ती की। वित्त क्षेत्र का दबदबा, 33% वृद्धि। एक्सेंचर, अमेज़ॅन और रिलायंस जैसी शीर्ष कंपनियां शामिल थीं।