रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: November 27, 2014 00:31 IST2014-11-27T00:31:05+5:302014-11-27T00:31:05+5:30

26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईसह सर्व ठिकाणच्या रेल्वे स्टेशनमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Ignore the safety of railway stations | रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : 26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईसह सर्व ठिकाणच्या रेल्वे स्टेशनमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. परंतु नवी मुंबई, पनवेल परिसरातील अत्याधुनिक रेल्वे स्थानकांची सुरक्षा मात्र अद्याप रामभरोसे आहे.  बंकरची कचरा कुंडी झाली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाणही वाढले असून रेल्वे स्थानकांना धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे उलटली तरी रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा-यावरच आहे.
नवी मुंबई व पनवेलमध्ये सिडकोने 15 अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारली आहेत. सीवूड्स स्थानकाचे काम सुरू आहे. रेल्वे स्थानकांची भव्य वास्तू उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. बेलापूर, वाशीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क आहे. इतर ठिकाणीही दुकाने व कार्यालयांची रचना करण्यात आली आहे. परंतु सुरक्षेसाठी मात्र प्खबरदारी घेण्यात आलेली नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर वाशी व बेलापूर स्थानकामध्ये सर्व प्रवाशांच्या बॅग तपासल्या जात होत्या. परंतु आता तिथे फक्त टेबल, खुर्ची पाहावयास मिळते. पोलीस प्रवाशांकडे पाहातही नाहीत. रात्री इमारतीच्या बाहेरील बाजूला शेकडो भिकारी आश्रय घेत आहेत. सानपाडा स्टेशन इमारतीमधील काही हॉलचाही धर्मशाळेप्रमाणो वापर होत आहे. या ठिकाणी कोणीही ये - जा करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खासदारांनी यापूर्वी केलेल्या पाहणीमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर वाशी, सानपाडा, जुईनगर व इतर स्टेशनमध्ये बंकर तयार केले आहेत. परंतु याचा वापर तंबाखू खाणारे थुंकण्यासाठी करत आहेत. रेल्वे स्टेशनमध्ये बिनधास्तपणो भेळ विक्रेत्यांनी बस्तान बसविले आहे. परंतु काहीच कारवाई होत नाही. बहुतांश स्थानकांमध्ये दिवसा पोलीस दिसतच नाहीत. 
 
च्रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेकडे पोलीसही दुर्लक्ष करत आहेत. दिवसभर प्लॅटफॉर्मवर भेळ विकणा:या अनधिकृत फेरीवाल्यांना तक्रारी करूनही हटविले जात नाही. 
च्येणा:या - जाणा:या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नाही. पोलीस व प्रवाशांशी संवाद साधण्यासाठीही पुरेशा उपाययोजना होत नसल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Ignore the safety of railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.