मुलुंडकरांच्या अडचणींकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: October 12, 2014 00:56 IST2014-10-12T00:56:44+5:302014-10-12T00:56:44+5:30
मोदीप्रभावाच्या लाटेचे भांडवल करू पाहणा:या भाजपाच्या उल्लू बनाविंग पॉलिसीला जनता बळी पडणार नाही.

मुलुंडकरांच्या अडचणींकडे दुर्लक्ष
>मुंबई : मोदीप्रभावाच्या लाटेचे भांडवल करू पाहणा:या भाजपाच्या उल्लू बनाविंग पॉलिसीला जनता बळी पडणार नाही. मुलुंडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भाजपाची सत्ता असूनही येथील लोकप्रतिनिधीने जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या नाहीत. कोणतेही ठोस काम केलेले नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख, ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी केली.
मुलुंडमधील काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा यांच्या प्रचारार्थ काल अमरनगर चौक येथे राणोंची जाहीर सभा झाली. त्यात ते बोलत होते. या वेळी राणोंसोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी खासदार ऑस्कर फर्नाडीस उपस्थित होते.
महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करण्याचा कट भाजपा आखते आहे. या देशाचे, राज्याचे आणखी किती लचके तोडणार भाजपा, असा सवाल राणोंनी या वेळी केला. आपल्या भाषणात राणोंनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. आयुष्यभरात विधान भवनाचे तोंडही न पाहिलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहू नयेत, असे राणो म्हणाले.
गेल्या 1क् वर्षामध्ये आघाडी सरकारने महाराष्ट्रात केलेल्या विकासकामांची माहिती फर्नाडीस यांनी उपस्थित जनसमुदायाला दिली. सप्रा यांनी जी विकासकामे केली त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही प्रभावित झाल्या आहेत, असे फर्नाडीस यांनी सांगितले. मला संधी दिलीत तर मुलुंडच्या विकासासाठी प्रयत्न कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही सप्रा यांनी उपस्थितांना दिली.