Join us  

'ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा'

By महेश गलांडे | Published: December 15, 2020 2:03 PM

राज्य सरकारच्या पुस्तकाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणारही नाही, महाराष्ट्राची ताकद मोठी आहे, महाराष्ट्राचा कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

ठळक मुद्देराज्य सरकारच्या पुस्तकाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणारही नाही, महाराष्ट्राची ताकद मोठी आहे, महाराष्ट्राचा कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई - राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने राज्यातील जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे. ज्यांनी विज बिल वापरली त्यांनी विजेची बिलं भरावी याच दुमत नाही, पण ज्यांनी वापरलीच नाही, जी वीज वापरलीच नाही त्यांचं बिल का द्यायचं? असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच, सरकारमधील विसंवादावर बोलताना, तुम्हाला ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा मिटवा, असे फडणवीस यांनी म्हटले. 

राज्य सरकारच्या पुस्तकाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणारही नाही, महाराष्ट्राची ताकद मोठी आहे, महाराष्ट्राचा कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, पुस्तकातील मुख्यमंत्र्यांचा संवाद वाचून दाखवताना राज्य सरकारमधील विसंवाद फडणवीस यांनी बोलून दाखवला. महाविकास आघाडीतील माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने एकदिलाने, एकमताने निर्णय घेण्यास साथ दिली. कुठेही विसंवाद अथवा मतभेद नाहीत, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. मग, विजबिलाच्या सवलतीचं काय झालं? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. 

विज बिलाच्या सवलतीवर एकमताने निर्णय का झाला नाही. राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्टेटमेंटचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी अद्याप का निर्णय घेतला नाही. या सर्वच नेत्यांच्या संवादात कुठेही एकमत दिसत नसल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं. मुख्यमंत्र्यांनी विज बिलासंदर्भात मौन धारण केलं, एक अक्षरही ते बोलले नाहीत, हा कसला संवाद आहे. अध्यक्ष महोदय तुम्हाला विसंवाद करायचाय विसंवाद करा, एकमेकांची डोकी फोडायचीत फोडा, नका फोडू तशी... पण फोडायची असतील तर फोडा, पण किमान तुम्ही जी आश्वासनं दिली, ती तरी पूर्ण करा. आम्ही मोफत वीज देणार हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वत:हूनच घोषित केलं होतं, याची आठवणही फडणवीस यांनी करुन दिली.

विज बिलावरुन राज्यभर आंदोलन  राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. मनसेने वीजबिल माफीवरुन आक्रमक भूमिका राज्यभर आंदोलन केलं. तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. 

बावनकुळेंचा सवाल

राज ठाकरे, फडणवीस आणि बावनकुळेंनी वीजबिल भरलं असल्याच्या नितीन राऊत यांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. ''आम्ही वीजबिल भरुच आणि ते भरायलाच हवं. नितीन राऊत यांनीही ते भरायला हवं. प्रश्न लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांचा नाही. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या गरीब जनतेचा आहे. त्यांना आलेली हजारो रुपयांची बिलं ते भरणार कुठून? हा प्रश्न आहे'', असं बावनकुळेंनी यापूर्वीच म्हटले होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफ करण्याची घोषणा करुन त्यानंतर आपला शब्द फिरवून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसवीजनितीन राऊतअजित पवार