‘तुम्हाला हसू येईल, तर मला रडू येईल’
By Admin | Updated: October 9, 2014 01:36 IST2014-10-09T01:36:24+5:302014-10-09T01:36:24+5:30
मी उपमुख्यमंत्री झालो तर तुम्हाला हसू येणार असेल, तर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर मला रडू येईल, अशी बोचरी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर केली.

‘तुम्हाला हसू येईल, तर मला रडू येईल’
मुंबई : मी उपमुख्यमंत्री झालो तर तुम्हाला हसू येणार असेल, तर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर मला रडू येईल, अशी बोचरी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर केली. माझी टिंगल करणे थांबवा अन्यथा महागात पडेल, असा निर्वाणीचा इशाराही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वडाळ्यातील जाहीर सभेत दिला.
युती तुटल्यानंतर रिपाइंने शिवसेनेशी काडीमोड घेऊन भाजपासोबत संसार थाटला. यावर राज ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. आठवले यांना सेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाची आॅफर होती. पण आठवले हे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांच्या घरच्यांनाही यावर विश्वास बसणार नाही, असा टोला राज यांनी हाणला होता.
राज हे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे वाटोळे करतील आणि माझ्यावर टीका करणे आता थांबवा, अन्यथा महागात पडेल, असा इशाराही आठवले यांनी दिला. (प्रतिनिधी)