Join us

आरटीओंशी हुज्जत घालाल, तर आता थेट कारागृहामध्ये जाल! वाहन निरीक्षकांना मिळणार बॉडी कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:53 IST

Mumbai: नियमबाह्यपणे वाहन चालविणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कारवाई करतात किंवा वाहन अवैध असल्यास मोडीत काढले जाते. आरटीओसह वाहन निरीक्षकांशी वाहनचालक हुज्जत घालतात.

मुंबई - नियमबाह्यपणे वाहन चालविणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कारवाई करतात किंवा वाहन अवैध असल्यास मोडीत काढले जाते. आरटीओसह वाहन निरीक्षकांशी वाहनचालक हुज्जत घालतात. मात्र, आता अशा प्रकारांना लगाम बसणार आहे. वाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे मिळणार आहेत. यासाठी रस्ता सुरक्षा उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समिती स्थापन करण्यात आली आहे.  नियमबाह्यपणे वाहन चालविणाऱ्यांची अरेरावी या बॉडी कॅमेऱ्यांमध्ये आपोआप रेकॉर्ड होणार आहे.मुंबईतील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयालाही कॅमेरे मिळणार आहेत. 

मुंबईत वादाचे एकही प्रकरण नाहीगेल्या आठ महिन्यांत वाहन निरीक्षकांशी हुज्जत घातल्याचे एकही प्रकरण आढळले नाही. त्यामुळे सध्या तरी मुंबईतील वाहनधारक शिस्तबद्ध आहेत. तसेच अधिकाऱ्यांचा धाकही दिसून येतो.

रेकाॅर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्यएखाद्या वाहनधारकाने वाहन निरीक्षकाशी हुज्जत घालल्यास व हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यास बॉडी कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालेला घटनाक्रम पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.

५० हून अधिक बॉडी कॅमेरे मिळणारपरिवहन आयुक्तांकडून बॉडी कॅमेरे खरेदी करून ते राज्यातील सर्व कार्यालयांना पाठविले जाणार आहेत. त्यानुसार मुंबईत सुमारे ५० हून अधिक बॉडी कॅमेरे मिळणार आहेत.

टॅग्स :मुंबई