लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कथित अश्लील व्हिडीओमध्ये दिसत असल्याने राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांच्या त्या व्हिडीओची चौकशी केली जाईल आणि त्यात सत्य आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, झिरवाळ यांनी मला दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्यांचे म्हणणे असे आहे, की तीन-चार व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने जोडून तो व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. तेव्हा मी त्यांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी पोलिसात तत्काळ तक्रार दाखल करावी. या व्हिडीओची शहानिशा केली जाईल. सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी योग्य तो निर्णय करू.
झिरवाळ यांच्या मंत्री कार्यालयातील एकाला लाच घेताना मागे पकडले होते. आता या कथित व्हिडीओने सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे तेव्हा त्यांचा राजीनामा घेणार का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, लाचेचे जे प्रकरण मागे झाले होते त्याची चौकशी करण्यात आली. त्या प्रकरणात झिरवाळ यांचा सहभाग नव्हता.
तत्काळ राजीनामा नाही!
मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान आणि राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) सूर लक्षात घेता नरहरी झिरवाळ लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देतील ही शक्यता दिसत नाही. झिरवाळ तक्रार करतील, त्याची चौकशी होईल, त्यातून जे काही समोर येईल त्या आधारे कारवाई केली जाईल, असे ठरले आहे.
सूत्रांनी सांगितले की झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही फोन केला आणि त्यांची बाजू मांडली. दरम्यान, राज्यातील महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने मात्र झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
Web Summary : CM Fadnavis assures inquiry into minister Zirwal's alleged obscene video. Action will be taken if found true. Zirwal denies claims, alleging video manipulation, and has been advised to file a complaint. Resignation unlikely immediately.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने मंत्री झिरवाल के कथित अश्लील वीडियो की जांच का आश्वासन दिया। सच पाए जाने पर कार्रवाई होगी। झिरवाल ने वीडियो में हेरफेर का आरोप लगाते हुए इनकार किया और शिकायत दर्ज कराने की सलाह दी गई। इस्तीफे की संभावना तत्काल नहीं।