Join us  

#KamalaMillsFire - 'या' मनसे कार्यकर्त्याचे ऐकले असते तर वाचले असते 14 जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 1:01 PM

कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये घडलेल्या अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेला. इमारतीच्या टेरेसवरील  मोजो आणि वन अबाव्ह या पब आणि रेस्टॉरंटमुळे ही आग भडकली. 

ठळक मुद्देमंगेश कशाळकर यांनी कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवला होता.  कमला मिल कंपाऊंडमध्ये कुठेही अनधिकृत गोष्टी नाहीत असे उत्तर महापालिकेकडून देण्यात आले होते.

मुंबई - लोअर परेल परिसरात राहणारे स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केलेल्या तक्रारीची मुंबई महापालिकेने वेळीच दखल घेतली असती तर आज अनेकांचे जीव वाचले असते.  कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये घडलेल्या अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेला. इमारतीच्या टेरेसवरील  मोजो आणि वन अबाव्ह या पब आणि रेस्टॉरंटमुळे ही आग भडकली. 

मंगेश कशाळकर यांनी कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी महापालिकेकडे याविरोधात रीतसर तक्रार नोंदवली होती. इथे अग्नि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा त्यांनी आरोप केला होता. पण नेहमीप्रमाणे महापालिकेने ही बाब फारशी गांर्भीयाने घेतली नाही.  कमला मिल कंपाऊंडमध्ये कुठेही अनधिकृत गोष्टी नाहीत असे उत्तर महापालिकेकडून देण्यात आले होते. ते ही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने उत्तर देण्याची तसदी घेतली. वेळीच महापालिकेला जाग आली असती तर अनेकांचे जीव वाचले असते. 

महिनाभरात अग्नितांडवात 27 निष्पापांचा गेला बळीवर्षाखेरीस मुंबईत छोट्या-मोठ्या आगी लागण्याचे सत्र पहायाला पहायला मिळाले. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात 2017 मध्ये दर महिन्याला सुमारे 10 ते 15 आगीच्या घटनांची नोंद होते. सातत्याने लागणार्‍या या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे आहे. साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगार होरपळले. हादरवून सोडणा-या या घटनेनंतर आज लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 15 जण जिवानिशी गेले. या आगीचे अशा अनेक दुर्घटना मुंबई शहर आणि उपनगरांत घडल्या असून, यात 27 जणांचा नाहक बळी गेला आहे. 

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवमुंबई