घर फुटलं तर फुटू दे..पण इगो जपायचा रे भाऊ !

By Admin | Updated: September 20, 2014 02:10 IST2014-09-20T02:10:11+5:302014-09-20T02:10:11+5:30

(हातातल्या भगव्या दो:याला पीळ मारत) तुला हजारदा सांगितलं की माङया घरात फक्त माझाच रुबाब चालणार. तू असशील तुङया गुजरातमधल्या माहेरात मोठ्ठी; पण इथं मी म्हणोन तेच खरं.

If the house flutters, give it a foot. | घर फुटलं तर फुटू दे..पण इगो जपायचा रे भाऊ !

घर फुटलं तर फुटू दे..पण इगो जपायचा रे भाऊ !

(एक आटपाट नगर होतं. त्या नगरात 25 वर्षापासून एक कुटुंब सुखानं नांदत होतं; पण कुणाची नजर लागली कुणास ठावूक़ नवरा-बायकोत किरकोळ कारणावरून सुरू झालेलं भांडण भलत्याच टोकाला गेलेलं.)
नवरा : (हातातल्या भगव्या दो:याला पीळ मारत) तुला हजारदा सांगितलं की माङया घरात फक्त माझाच रुबाब चालणार. तू असशील तुङया गुजरातमधल्या माहेरात मोठ्ठी; पण इथं मी म्हणोन तेच खरं.
बायको : (भगवा पदर खांद्यावरून खाली खोचत) खूप सहन केलं आजर्पयत मी तुमचं. सासरे बुवा कडक होते म्हणून मी जरा दबकून होते, याचा अर्थ आयुष्यभर मी तुमच्यासमोरही झुकावं की काय?
नवरा : (कुत्सितपणो ) हे तू नाही, तुङया माहेरचा रुबाब बोलतोय. साधं चिटपाखरू फिरत नव्हतं की तुङया माहेरी पूर्वी. तेव्हा खालची मान वर होत नव्हती तुझी.
बायको : (चवताळून) पुन्हा माङया माहेरच्यांबद्दल बोलाल तर याद राखा. 
नवरा : विसरलीस का ? दोन आठवडय़ांपूर्वी तुङया मोठय़ा भावाला मीच फोन करून घरी बोलावलं होतं. 
बायको : (धुसफुसत) तोच तर प्रॉब्लेम झालाय नां माझा. लोकांना दाखवायला वरवर ‘मानपान’ तुम्ही छान करता; पण आतून मात्र ‘सन्मान’ विसरता. साधं 144 रुपये मागितलं तर किती झोंबतं लगेच नाकाला? 
नवरा : (तावतावानं) मी तुला शेवटचंच सांगतो. 288 रुपये आहेत आपल्याकडं . त्यातले फक्त 12क् रुपये देणार. त्यातच घरातल्या लेकरांचंही भागव. मला मात्र कोणत्याही परिस्थितीत बाकीचे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच.
बायको : (आदळआपट करत) असं असेल, तर मला तुमच्यासोबत नांदायचंच नाही. 
नवरा : (अस्सल मराठमोळी मर्दानगी दाखवत ) हरकत नाही. मग हो ùù बाहेर ताबडतोब. 
बायको : (मराठी मालिकेतल्या सुनेचं धूर्त हास्य चेह:यावर खेळवत) मी कशाला बाहेर होऊ? तुमच्या इतकाच माझाही अधिकार, या घरावर. निम्मी हिस्सेदार आहे मी इस्टेटीची. हे ‘घर माझं अन् घरातले देव’ ही माङो!
नवरा : (हबकून) आँ ? तू बायको आहेस की वकील? 
बायको : (भुवया तिरक्या करून मिस्कीलपणो) परवा पुण्यात माङया भावानं ‘डोक्यावर पगडी’ घातली अन् ‘हातात तलवार’पण घेतली. त्यावरून ओळखा की, ‘आम्ही दिसतो तसे आहोत का.अन् आहोत तसे दाखवतो का?’
नवरा : (घरातल्या लेकरांना समोर उभं करत) रामू, राजू अन् म्हादूùù सांगा, तुम्ही कुणाचे? तिचे का माङो? 
(बिचा:याùù तिघांनाही काय उत्तर द्यावं सुचत नाही. सारेच भोकांड पसरून रडण्याच्या तयारीत. तर वाचकहो.या प्रश्नाचं उत्तर किमान तुम्हाला तरी देता येतं का पाहा. तोर्पयत ‘जय हिंद. जय महाराष्ट्र’. साठा उत्तराची कहाणी असफल अपूर्ण !! )
                                    - सचिन जवळकोटे
 

 

Web Title: If the house flutters, give it a foot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.