दोषी ठरलो तर अटक करा !

By Admin | Updated: October 31, 2014 23:00 IST2014-10-31T23:00:42+5:302014-10-31T23:00:42+5:30

ओवळा-माजीवडा मतदारसंघात ज्यांना मी पराभूत केले ते भाजपाचे उमेदवार आणि ठाणो महापालिकेचे नगरसेवक संजय पांडे यांना मी गेल्या सहा महिन्यात कधीही भेटलो नाही.

If convicted, get arrested! | दोषी ठरलो तर अटक करा !

दोषी ठरलो तर अटक करा !

ठाणो  : ओवळा-माजीवडा मतदारसंघात ज्यांना मी पराभूत केले ते भाजपाचे उमेदवार आणि ठाणो महापालिकेचे नगरसेवक संजय पांडे यांना मी गेल्या सहा महिन्यात कधीही भेटलो नाही. मग खंडणी मागायचा प्रश्न येतोच कुठे? पोलिसांनी याप्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता एफआयआर दाखल करून घेतला आहे. आता त्यांनी 48 तासाच्या आत याची चौकशी पूर्ण करावी मी दोषी असेन तर मला तत्काळ अटक करावी आणि तक्रारीत तथ्य नसेन तर खोटी तक्रार केल्याबद्दल संजय पांडेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी आव्हानात्मक प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या खंडणी एफआयआरप्रकरणी लोकमतशी बोलतांना दिली.
त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वस्तुस्थिती अशी आहे की, संजय पांडे नगरसेवक असलेल्या सुभाषनगर या वॉर्डात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले होते. अनेक संशयीत रुग्ण तिथे होते. त्यामुळे मी महापालिकेच्या ज्येष्ठ अभियंत्यांना घेऊन पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी माङया सोबत एका प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्रचे प्रतिनिधी होते. 
डेंग्यूग्रस्त भागाची पाहणी करीत असताना तेथील नागरिकांनी निवडणूक आचारसंहितेच्या काळात या परिसरात जी अवैध बांधकामे आणि अतिक्रमणो झालीत ती दाखविली. तेव्हा याबाबत कारवाई करावी अशी विनंती मी अभियंत्यांना केली, तेव्हा त्यांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या उपआयुक्तांशी संपर्क साधला आणि ही अतिक्रमणो व अवैध बांधकामे तातडीने हटवावी असे निर्देश दिलेत. त्यावर पोलीस बंदोबस्त मिळताच ही बांधकामे अतिक्रमणो हटविली जातील असे त्यांनी सांगितले. ही सर्व बांधकामे व अतिक्रमणो स्थानिक नगरसेवकाच्या आशीर्वादाने उभी राहिली होती असेही नागरिकांनी सांगितले. 
हा परिसर माङया मतदारसंघात येत असल्याने त्यांनी ही माहिती मला दिली. त्यानंतर मी महापालिका आयुक्तांची भेट घेतली व कारवाई करण्याची मागणी केली. हे कळताच माङयाविरुद्ध या खंडणी प्रकरणाची कोल्हेकुई सुरू झाली. 
(विशेष प्रतिनिधी)
 
आमदार प्रताप सरनाईक यांचे पोलिसांना आव्हान
4जेव्हा मला या प्रकरणाची माहिती मिळाली त्यावेळी मी पोलीस आयुक्त विजय कांबळे आणि सहपोलीस आयुक्त  लक्ष्मीनारायण यांची भेट घेतली व हा एफआयआर दाखल करून घेण्यापूर्वी आपण काय चौकशी केली? आपण प्रतिपक्षाला म्हणजे मला चौकशीसाठी बोलावले नाही, कुठली नोटीस बजावली नाही हे कोणत्या नियमात बसते? आता आपण या एफआयआरची 48 तासांच्या आत चौकशी करा आणि मी दोषी ठरलो तर मला तत्काळ अटक करा आणि तक्रार बोगस निघाली तर खोटा गुन्हा दाखल करणा:याविरुद्ध त्याला अटक करण्याचे धैर्य दाखवा, असे आव्हानच पोलिसांना दिले आहे असेही सरनाईक यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: If convicted, get arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.