तर रिक्षा बंद झालाच नसता
By Admin | Updated: December 16, 2014 22:47 IST2014-12-16T22:47:14+5:302014-12-16T22:47:14+5:30
सोमवारी डोंबिवलीत आरपीआय प्रणित रिक्षा युनयिनने बंद पुकारला होता, त्यामुळे शेकडो प्रवाशांना त्रास झाला. मात्र ही मागणी मांडून दोन महिने झाले होते,

तर रिक्षा बंद झालाच नसता
डोंबिवली : सोमवारी डोंबिवलीत आरपीआय प्रणित रिक्षा युनयिनने बंद पुकारला होता, त्यामुळे शेकडो प्रवाशांना त्रास झाला. मात्र ही मागणी मांडून दोन महिने झाले होते, तसेच अन्यथा रिक्षा बंद करण्यात येइल असा इशाराही देण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक आमदारांसह वाहतूक पोलिसांनी कोणतीही हालचाल न केल्याने हा पवित्रा घ्यावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी केलेल्या बंदनंतर दुपारपासून रिक्षा वाहतूक तुरळक प्रमाणात सुरु झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना रात्रीपर्यंत सोसावा लागला. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच युनियनचे रामा काकडे यांनी या बंद मागील आणखी एक कारण स्पष्ट केले. काकडे म्हणाले की, आमदार रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीही याबाबत सहकार्याची भूमिका घेतली होती, परंतू मध्यंतरीच्या काळात निवडणुकांचे सत्र लागले, त्यानंतर युतीचे नाट्य आणि आता अधिवेशन अशा सर्व एकामागोमाग एक शासकीय अडचणींमुळे सीएनजी पंप सुरु करण्याच्या मागणीचा विसर पडल्याचे आमच्या लक्षात आले, आणि त्यातून संघटनेच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या अनुमते हा बंद करण्यात आला.
हा बंद होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस निरीक्षक बाळासाहेब कदम, आणि रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल शिवरकर यांनी दोन दिवस आधी बैठकही बोलवाली होती, मात्र त्यात तोडगा निघाला नसल्याचे सांगितले.