युती तुटल्यास सेनेच्या हातून मुंबई मनपा जाईल
By Admin | Updated: September 20, 2014 02:11 IST2014-09-20T02:11:25+5:302014-09-20T02:11:25+5:30
शिवसेना-भाजपा युती तुटल्यास मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ताच धोक्यात येणार आह़े तर, नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून शिवसेना दुस:या स्थानावर आहे.

युती तुटल्यास सेनेच्या हातून मुंबई मनपा जाईल
मुंबई : शिवसेना-भाजपा युती तुटल्यास मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ताच धोक्यात येणार आह़े तर, नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून शिवसेना दुस:या स्थानावर आहे. येथील विधानसभेच्या दोन्ही जागांवर सेनेने दावा ठोकला असून महायुती तुटली तर ती येथील पदाधिका:यांना हवीच आहे.
भाजपाबरोबर केलेल्या युतीच्या जोरावरच शिवसेनेला तब्बल 17 वर्षे (1995 ते 2क्14) मुंबई महापालिकेवर भगवा फडकविता आला आह़े
सन 2क्12च्या महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तीन जागा वाढल्या़ त्याअनुषंगाने भाजपा नेत्यांच्या मागण्याही वाढू लागल्या़ त्यामुळे अधूनमधून उभय पक्षांमधील कुरबुरी उघड होऊ लागल्या होत्या़
या निवडणुकीत शिवसेनेचे 75
तर भाजपाचे 31 सदस्य निवडून
आले आहेत़ अखिल भारतीय सेनेच्या दोन आणि 13 अपक्षांच्या पाठिंब्यावर युतीने महापालिकेत सत्ता स्थापन
केली आह़े
शिवसेना आणि भाजपा वगळता पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे 64, मनसेचे 27 आणि समाजवादीचे 9 सदस्य असे बलाबल आहे.
भाजपा नाममात्र
नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापन केली होती. परंतु ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यापासून सेना कायम दुस:या किंवा तिस:या स्थानावर राहिली आहे. सध्या 89 पैकी 17 नगरसेवक शिवसेनेचे असून, विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आहे. भाजपाची फक्त एकच नगरसेविका असून शहरात संघटनात्मक बांधणीच नाही.