आदित्य ठाकरेंना वरळीतून उमेदवारी दिल्यास दिवस रात्र एक करू : अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:55 IST2019-08-31T06:55:33+5:302019-08-31T06:55:49+5:30

वरळी आदर्श नगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.

If Aditya Thackeray gets ticket from Worli, we will work hard: Anil Parab | आदित्य ठाकरेंना वरळीतून उमेदवारी दिल्यास दिवस रात्र एक करू : अनिल परब

आदित्य ठाकरेंना वरळीतून उमेदवारी दिल्यास दिवस रात्र एक करू : अनिल परब

मुंबई : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रेद्वारे महाराष्ट्र फिरण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर त्यांच्या निवडणूक लढविण्यासाठीच्या चर्चांनाही उधान आले आहे. गेल्या काही दिवसांपासून वरळी विधानसभा जागेवरून आदित्य लढणार असल्याचे बोलले जात आहे. 


वरळी आदर्श नगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवक्ते अॅड. अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच आदित्या ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केल्यास शिवसैनिक या भागात दिवसाची रात्र करून विरोधकांचे डिपॉझिट जप्त कररतील असा शब्दही उद्धव यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: If Aditya Thackeray gets ticket from Worli, we will work hard: Anil Parab