Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 02:50 IST

अंधेरी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी पायल घोषही उपस्थित होती.

मुंबई : अभिनेत्री पायल घोष यांच्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. सात दिवसांत त्याच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी दिला.

अंधेरी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी पायल घोषही उपस्थित होती. अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीला आता सात दिवस झाले तरी कश्यप यांना चौकशीसाठीसुद्धा बोलावण्यात आले नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई केल्यास नव्या कलाकारांचे कोणीही शोषण करणार नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांत कश्यप यांना पोलिसांनी अटक करावी, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :रामदास आठवलेअनुराग कश्यप